featured, इव्हेंटस्, बांधकाम, बिल्डींग मटेरियल्स

जिओ पॉलीमर सिमेंटचा वापर वाढावा

नागपूर प्रतिनिधी । पारंपरीक सिमेंटपेक्षा जिओ पॉलीमर सिमेंट हे पर्यावरणानुकुल असल्याने याचा वापर वाढावा अशी अपेक्षा महाजनको अ‍ॅश मॅनेजमेंट सर्व्हीसेस लिमिटेडचे संचालक सुधीर पालीवाल यांनी केले. ते येथे सुरू असणार्‍या ग्रीन अ‍ॅशकॉन या परिषदेत बोलत होते.

नागपूर येथे तीन दिवसीय ग्रीन अ‍ॅशकॉन ही परिषद नुकतीच पार पडली. यात बोलतांना सुधीर पालीवाल यांनी विविध विषयांना स्पर्श केला. ते म्हणाले की, सध्या प्रचलीत असणार्‍या पोर्टलँड सिमेंटच्या उत्पादनामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात उत्सर्जीत होत असतो. यामुळे प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे याऐवजी पॉलीमर सिमेंटचा वापर केल्यास कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात लक्षणीय घट होऊ शकते. याशिवाय, पोर्टलँड सिमेंटमधील अनेक त्रुटी पॉलीमर सिमेंटमध्ये नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Leave a Comment

Your email address will not be published.