घडामोडी, शासकीय

गरिबांना मिळणार हक्काची जागा-मुख्यमंत्री

नागपूर प्रतिनिधी । राज्यात ग्रामीण व शहरी भागात पट्टेवाटपाची प्रक्रिया सुरु असल्यामुळे गरीब माणसाला हक्काची जागा मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टेवाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, अनिल सोले, जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर सुधार प्रन्यास सभापती शीतल तेली उगले आदी उपस्थित होते. यावेळी ५५ झोपडपट्टीधारकांना प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते पट्टेवाटप करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासूनची हक्काचा पट्टा मिळावा अशी मागणी होती. यापूर्वीच्या शासनाने अनेकदा घोषणा केल्या, मात्र गरीब लोकांना त्यांचा जागेचा पट्टा मिळाला नाही. असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले. गरीबांना स्वत:च्या जमिनीचा मालकी पट्टा देण्याचा निर्णय या शासनाने घेतला. राज्यात ग्रामीण भागात एक लाख नागरिकांना पट्टेवाटप करण्यात येणार आहे. शहरी भागातही पट्टेवाटपाची प्रक्रिया सुरु आहे. पट्टयाची नोंदणी करुन दिल्यामुळे गरीब माणसाला हक्क मिळाला. जागेची नोंदणी करण्याबरोबरच कच्च्या घरात राहणार्‍या गरीब माणसाला पक्के घर देण्याचाही शासनाचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, नागपूर शहरात ३५ हजार लोकांना पट्टेवाटप करण्यात येत असून त्यांची नोंदणी सुरू असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तर, पूर्व नागपुरात नासुप्रच्या जागेवर १६ झोपडपट्टयांतील ९ हजार ८३३ झोपडपट्टीधारकांना पट् वाटप करण्यात येणार असल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published.