featured, तंत्रज्ञान, बिल्डींग मटेरियल्स

आता लवचीक काँक्रीटचा वाढणार वापर !

Share

काँक्रीट हे लवचीक असू शकते यावर आपला विश्‍वास बसणार नाही. तथापि, शास्त्रज्ञांची याच प्रकारच्या काँक्रीटला विकसित करण्यात यश मिळवले आहे.

सिंगापूरच्या नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी कॉनफ्लेक्सपेव्ह या नावाने नवीन काँक्रीट तयार केले आहे. सिमेंट, वाळूसह अन्य मटेरियल्सने युक्त असणार्‍या पारंपरीक काँक्रीट इतकेच हे मजबूत आणि विविध बांधकामांसाठी उपयुक्त आहे. मात्र यातील एक खासियत ही अतिशय नाविन्यपूर्ण अशीच आहे. पारंपरीक काँक्रीट हे एकदा पक्के बनले की, आकार बदलू शकत नाही. आणि ते लवचीकही नसते. तथापि, कॉनफ्लेक्सपेव्ह हे याच्या अगदी उलट म्हणजे लवचीक आहे. त्याला मशिनच्या मदतीने हवा तसा आकार देण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. लवचीकपणासाठी यात ठोस पदार्थांसह पॉलीमर मायक्रो-फायबर्सही टाकण्यात आले आहे. यामुळे या प्रकारचे काँक्रीट हे हव्या त्या आकारात अगदी घट्टपणे बसू शकणार आहे. याच्या मदतीने अगदी कोणत्याही आकाराचे ब्लॉक तयार करून वापरता येणार आहे. सर्व प्रयोगांमध्ये कॉनफ्लेक्सपेव्ह हे काँक्रीट यशस्वी झाले असून याला लवकरच व्यावसायिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कॉनफ्लेक्सपेव्ह हे बांधकाम व्यवसायासाठी अगदी गेम चेंजर सिध्द होणार असल्याचा दावा अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कारण याच्या मदतीने काँक्रीटच्या उपयुक्ततेत वाढ होणार आहे. याशिवाय, यामुळे बांधकामासाठी लागणार्‍या मजुरांच्या संख्येतही लक्षणीय घट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा