featured, इव्हेंटस्, एक्झीबिशन्स

क्रेडाईतर्फे कोल्हापूरात दालन-२०१९ प्रदर्शनीचे आयोजन

Share

कोल्हापूर प्रतिनिधी । क्रेडाईच्या कोल्हापूर शाखेतर्फे येथील शाहूपुरी जिमखान्यात ८ ते ११ फेब्रुवारीच्या दरम्यान दालन-२०१९ या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे उदघाटन दि. ८ रोजी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार असून नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील प्रमुख पाहुणे आहेत. या प्रदर्शनाचा हेतू कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली नवनवीन बांधकाम प्रकल्प व तंत्रज्ञान, बांधकामविषयक साहित्य, सेवा, अर्थसहाय्य योजना यांची माहिती देण्याचा आहे. घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यास प्रदर्शनाचा मोठा हातभार लागणार आहे. हे प्रदर्शन बीगर-बेटर-बोल्डर या संकल्पनेवर आधारित असून लक्ष्य यंदा संधी सर्वांसाठी असे आहे. या प्रदर्शनात १६० स्टॉल असून सर्व स्टॉलचे बुकिंग झाले आहे. क्रेडाईचे जवळपास ७० सभासद असून शंभाराहून अधिक प्रकल्प प्रदर्शित करणार आहे.

दालन-२०१९ या या प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा प्रारंभ क्रेडाईचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविकामध्ये विद्यमान अध्यक्ष महेश यादव यांनी संघटनेच्या ३० वर्षांच्या कारकीर्दीत बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्याबरोबर शहराच्या विकासात केलेल्या कामाची माहिती दिली. दालनामध्ये महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सचा विषय मांडणार असून प्राधिकरणाबाबत भूमिका सादर करण्यात येणार असल्याचे यादव यांनी सांगितले.

दालन २०१९ चे टायटल स्पॉन्सर महालक्ष्मी टीएमटी बार असून डायमंड स्पॉन्सर क्रिष्टा इलेव्हेटर आहेत. गोल्डन स्पॉन्सर रोका बाथरूम प्रोडक्ट, मेरशा शेपर्स, हार्डवेअर कन्सेप्ट, एच.डी.एफ.सी., बिर्ला शक्ती सिमेंट, एजील तर को-स्पॉन्सर एल. के. प्लाय, यश पॉली, कॅनरा बँक, जोतून पेंट, रिनूट्रॉन पॉवर सोल्युशन, रिन्यूग्रीन, आरास, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल हौसिंग फायनान्स, क्युरेट रेडिमिक्स काँक्रिट, ओटीस लिफ्ट, आयसीआयसीआय बँक, कल्पतरू डोअर, महालक्ष्मी सिरॅमिक, शिंडलर लिस्ट, आयडीबीआय बँक, राजनंदिनी स्टोन क्रशर, आशीर्वाद पाईप, गृड्स होर्स पंप आहेत..

यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, दालनचे सेक्रेटरी विक्रांत जाधव, विविध कमिटींचे चेअरमन, सदस्य, पदाधिकारी, सभासद, प्रायोजक, स्टॉलधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPost


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा