बिल्डींग मटेरियल्स

बांधकामात वाळूला क्रश सॅन्डचा पर्याय; शासनाची मान्यता

चंद्रपूर – आता बांधकामात रेतीला क्रश सॅन्डचा पर्याय समोर आला आहे. याला तज्ज्ञांनी व शासनानेही मान्यता दिली आहे. मागील काही महिन्यापासून रेती घाटाचे लिलाव झाले नाही. त्यामुळे शासकीय व खासगी बांधकामे रेंगाळल्याची ओरड होवून मजुरांनाही काम मिळणार नसल्याचे मानले जाते. त्यामुळे आता मशीनमधून रेती तयार करण्यात येत आहे. या मशीनमधील[Read More…]

इमारत बांधकाम साहित्याचे भाव भडकले

मुंबई – इमारत बांधकामाशी निगडित साहित्याचे भाव वाढल्यामुळे लवकरच घरांच्या किमतीही गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सिमेंट टनामागे ५००, तर लोखंड ७५० रुपयांनी महागले आहे. सिमेंट दरातील वाढीला देशांतर्गत कंपन्यांचा निर्णय, तर लोखंडच्या किमतीतील वाढीला आंतरराष्ट्रीय बाजार कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंट व लोखंड या दोन अत्यावश्यक घटकांचा[Read More…]

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणात सिमेंटचे भाव भडकले

चेन्नई । गेल्या पाच दिवसात तेलगू राज्यात सिमेंटच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. किंमतीची वाढ अचानक झाल्याममुळे बांधकाम आणि रिअल इस्टेटच्या कामांमध्ये घसरण झाली आहे. बांधकाम उद्योग क्षेत्रातील संबंधित व्यक्तीनीं सिमेट बनविणार्‍या कंपन्यांना किंमती कमी करण्याची मागणी केली आहे. पाच दिवसांपुर्वी 50 किलो सिमेंटच्या पिशवीची किंमत 225 रूपयाला होती ती[Read More…]

आता लवचीक काँक्रीटचा वाढणार वापर !

काँक्रीट हे लवचीक असू शकते यावर आपला विश्‍वास बसणार नाही. तथापि, शास्त्रज्ञांची याच प्रकारच्या काँक्रीटला विकसित करण्यात यश मिळवले आहे. सिंगापूरच्या नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी कॉनफ्लेक्सपेव्ह या नावाने नवीन काँक्रीट तयार केले आहे. सिमेंट, वाळूसह अन्य मटेरियल्सने युक्त असणार्‍या पारंपरीक काँक्रीट इतकेच हे मजबूत आणि विविध बांधकामांसाठी उपयुक्त आहे. मात्र[Read More…]

वाळू दर निश्‍चित करण्याची खासदार राऊतांची मागणी

ओरोस प्रतिनिधी । खासदार विनायक राऊत यांनी महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत तात्काळ वाळू दरनिश्‍चित करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात नद्यांमधील हातपाटी पद्धतीने वाळू उत्खनन केले जाते. त्यासाठी प्रशासनाकडून दरवर्षी वाळू लिलाव प्रक्रिया राबविली जाते. मात्र यावेळी डिसेंबरपर्यंत वाळू लिलाव प्रक्रिया लावण्यात आली नव्हती. त्यासाठी[Read More…]

वाळू गट

वाळू धोरणात बदल करण्याची मोर्चाद्वारे मागणी

जळगाव प्रतिनिधी । सरकारच्या आडमुठ्या वाळू धोरणामुळे लक्षावधी बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून यात बदल करण्याची मागणी राष्ट्रवादी किसान सेलतर्फे करण्यात आली आहे. यासाठी जळगावात भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. सध्या बेकायदेशीर पध्दतीत वाळू उपसा सुरू असून यात तस्करांचे उखळ पांढरे होत आहे. मात्र वाळू उपशाला अधिकृत[Read More…]

जिओ पॉलीमर सिमेंटचा वापर वाढावा

नागपूर प्रतिनिधी । पारंपरीक सिमेंटपेक्षा जिओ पॉलीमर सिमेंट हे पर्यावरणानुकुल असल्याने याचा वापर वाढावा अशी अपेक्षा महाजनको अ‍ॅश मॅनेजमेंट सर्व्हीसेस लिमिटेडचे संचालक सुधीर पालीवाल यांनी केले. ते येथे सुरू असणार्‍या ग्रीन अ‍ॅशकॉन या परिषदेत बोलत होते. नागपूर येथे तीन दिवसीय ग्रीन अ‍ॅशकॉन ही परिषद नुकतीच पार पडली. यात बोलतांना सुधीर[Read More…]

वाळूची तस्करी रोखण्यासाठी कृत्रिम वाळू बंधनकारक करा

पाळधीचे कासट यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र शासनाचा महसूल वाढण्याचा दावा जळगाव – कोणत्याही नदी पात्रातील वाळू उत्खननाला होणारा विरोध, रात्री-अपरात्री करण्यात येणारी वाळूची चोरी त्यामुळे निर्माण होणारे संघर्ष टाळण्यासाठी दगडपासून तयार होणारे वाळूचा पर्याय पुढे आला आहे. त्यामुळे शासनाचा महसूलही वाढणार असून नदीपात्रातील वाळूच्या माध्यमातून बोकाळलेला भ्रष्टाचारालादेखील लगाम घालणे शक्य होणार[Read More…]

गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी सिमेंटची मागणी अधिक

नवी दिल्ली (पीटीआय) – देशात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण क्षेत्र, रस्ते, मेट्रो आणि सिंचन प्रकल्पांसारख्या पायाभूत सुविधांची वाढ होत आहे. या विकासासाठी सिमेंटला मोठी मागणी वाढली असल्याने गेल्या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये डिमांड 7 टक्के होता तो आता यावर्षी 8 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे आयसीआरए ( Investment Information and Credit Rating[Read More…]

वाळू धोरणात बदल करण्याची मागणी

जळगाव प्रतिनिधी । वाळू उपशाला परवानगी नसल्यामुळे बेरोजगारीत वाढ झाल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या या धोरणात बदल करण्याची मागणी केली आहे. याबाबत वृत्तांत असा की, वाळू उपसा करण्यावर सरकारने निर्बंध लादले आहेत. यामुळे लाखो मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या बंदीमुळे वाळुशी संबधित आणि बांधकाम व्यवसायाशी संबधित मजुरांवर[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा