Uncategorized, घडामोडी, नगरविकास

सोळा हजार घरांची लॉटरी लवकर म्हाडा काढणार

Share

मुंबई (प्रतिनिधी) – म्हाडा लवकरच सोळा हजार घरांची लॉटरी काढणार आहे. आता घर घेणार्‍या नागरिकांची प्रतिक्षा संपली. नाशिक, पुणे आणि औरंगाबादसह कोकणात ही घरे राहणार असून या संदर्भात जाहिरात म्हाडाकडून लवकरच प्रसिध्द केली जाणार आहे. निवडणुकीची आचारसंहितेपुर्वी ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक येथे ६ हजार ८०२ घरांची लॉटरी काढली जाईल. म्हाडाच्या मुंबई मंडळाला हाउसिंग कोट्यातून मिळालेल्या २३८ घरांची जाहिरात आचारसंहितेपूर्वी काढली जाणार आहे, शिवाय म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४ हजार ६६४ घरांचा समावेशही लॉटरीत करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील ९१७ तर नाशिक येथील १ हजार १८३ घरांचा लॉटरीत समावेश असणार आहे. मागील वर्षी कोकण मंडळातर्फे सोडत काढण्यात आली होती. यात विरार येथील घरांचा समावेश होता.
प्राधिकरणाच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग
म्हाडाच्या बैठकीत प्राधिकरणातील २ हजार ४५७ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण मंडळांतर्गत नऊ हजार घरांची लॉटरी काढली जाईल. कल्याण गोठेघरमधील २ हजार ४५५ आणि भंडारलीमधील १ हजार ७४३ घरे ही पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आहेत. ठाणे येथील मानपाडा, चितळघर येथील १ हजार १५० घरांची लॉटरी काढली जाईल. नैना प्रकल्पांतर्गतही घरे उभारण्यात येणार आहेत. पवई तुंगा येथील घरांच्या किमती कमी करण्याबाबत विचार केला जात आहे, असेही म्हाडाकडून सांगण्यात आले. चेंबूर येथील सहकार नगरमधील अल्प उत्पन गटातील १७० घरे, पवईमधील मध्यम उत्पन्न गटातील ४६ घरांचा यात समावेश आहे.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा