गृहनिर्माण, घडामोडी, नगरविकास, प्रधानमंत्री आवास योजना

सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील 1100 शिल्लक घरांची सोडत

Share

नवी मुंबई – सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील ११०० शिल्लक घरांसाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. सिडको भवनच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात सोडत प्रक्रिया केली जाणार आहे. या शिल्लक घरांसाठी सिडकोने १ जानेवारीपासून नव्याने अर्ज मागविले होते. अर्ज सादर करण्याच्या ३१ जानेवारीपर्यंत तब्बल ६०,००० ग्राहकांनी घरांसाठी अर्ज केले होते. मागील १५ दिवसांत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आली.

सिडकोने ऑगस्ट २०१८ मध्ये १५ हजार घरांची योजना जाहीर केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी असलेल्या या गृहप्रकल्पातील घरांसाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख अर्जदारांनी अर्ज भरले होते. यातील पात्र अर्जदारांची ऑक्टोबर महिन्यात संगणकीय सोडत काढली होती. परंतु काही विभागातील घरांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ११०० घरांची विक्री झाली नाही. या शिल्लक घरांत ७३ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी, तर उर्वरित १०२७ सदनिका अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिका केवळ पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्यांसाठी आहेत.
अशी आहेत घरे
तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये १४ हजार ८३८ घरांचा मेगागृहप्रकल्प उभारला जात आहे. संगणकीय सोडतीनंतर ११०० घरे शिल्लक आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तळोजा येथे ३९ तर द्रोणागिरी येथे ३४ घरे आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा येथे ६५०, खारघर ५९, कळंबोली ५३, घणसोली ४३ व द्रोणागिरी येथे २२२ घरे आहेत. शिल्लक घरांसाठी आज सोड निघणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेकांची लॉटरीकडे लक्ष लागून आहे.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा