गृहनिर्माण, घडामोडी, प्रधानमंत्री आवास योजना

सरकारी जागेवरील अतिक्रमणधारकांना पीएमएवाय अंतर्गत मिळणार घरे

मुंबई । राज्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना होत नसल्याने शहरी विकास विभागाने अतिक्रमण करणार्‍यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

गेल्या तीस वर्षांपासून भाड्याने राहत असलेल्या अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यापुर्वी त्यांना ज्याठिकाणी पुनर्वसन करायचे आहे त्याठिकाणचा आराखडा मजबुत करावा व सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या अश्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
बुधवार 12 फेब्रुवारी रोजी जारी केलल्या एका मसूद्यानुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी पुनर्वसन प्राधिकरणाकडून होत नसल्यास ते स्थानिक नागरी प्राधिकरणाकडे वर्ग करावे अश्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published.