featured, गृहनिर्माण, घडामोडी, नगरविकास, बंगला/रो-हाऊस, बांधकाम

भाडेत्तत्वावर जागा देवून विकास न करणार्‍या संस्थांना शेवटी सुवर्ण संधी-सिडको

Share

मुंबई । निवासी, व्यापारी, सेवा उद्योग, गोदाम, धार्मिक व शैक्षणिक यासाठी दिल्या जाणारे भाडे तत्वावरील व्यवहारात गैरप्रकार लक्षात आल्याने हा प्रकार रोखण्यासाठी सिडकोने आता नवीन योजना आणली असून या नियमाचे उल्लंघन करणार्‍यावर वचक बसणार आहे. खुल्या भुखंडावर अतिक्रमण करणार्‍यांवर काय उपाययोजना करता येईल याकडे सर्वांचे लक्ष देण्यात येणार आहे.
सिडकोने ज्यांना भाडेतत्वार देवून काही भागाचा विकास करण्याच्या बोलीवर ज्यांना जागा दिली होती त्यांना आता ही शेवटची सुवर्ण संधी असून त्यांनी येत्या सहा महिन्यात नवीन करार करून घ्यावा. आणि नवीन करारानुसार कराराच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या कालावधीच्या आता भूखंडाचा विकास करणे अनिवार्य आहे. मात्र यात ज्यांनी कर्तव्यकसून केला आहे. त्यांच्या नावाची यादी तयार करून घोषीत करण्यात येणार असल्याची माहिती सिडको यांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भखंड किंवा बांधकाम अद्याप पुर्ण झालेले नाही. आताच्या नवीन करारानुसार जे काही विकसक किंवा बांधकामदार आमच्यशी जुळले तर नवीन प्रकल्प किंवा अपुर्ण काम पुर्ण करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे शहर व्यवस्थापक फयाझ खान यांनी सांगितले.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा