घडामोडी, घडामोडी, प्रधानमंत्री आवास योजना

पीएमएवाय अंतर्गत मंजूर घरांची संख्या मतदानापूर्वी 75 लाखांवर पोहोचेल – गृहनिर्माण मंत्री

Share

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेपुर्वी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरांची संख्या 75 लाखांवर आकडा पोहचणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले.

प्रत्येकासाठी घरे ही संकल्पना राबविण्यासाठी अनेक सुक्ष्म निरीक्षण केले असून 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या उपक्रमाच्या माध्यमातून एक कोटी घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजन पुर्ण होण्यासाठी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव यांची राज्यस्तरीय बैठक दरमहिन्याला घेतली जाते. या बैठकीत येणाऱ्या अडचणींवर उपाय सोडविला जातो.
केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुढे बोलतांना सांगितले की, मला सांगायला आनंद होत आहे की दर महिन्याला मी जवळपास 5 हजार घर बांधकामाच्या प्रस्तावाला मंजूरी देतो. यापुर्वी 72 लाख घरांची मंजूरी देण्यात आली आहे.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा