गृहनिर्माण, घडामोडी, तंत्रज्ञान

पीएमएवायच्या लाभार्थ्यांसाठी ‘ॲप’वर फोटो अपलोड करण्याची सुविधा

Share

जयपूर । पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळालेल्या घरांचे लाभार्थी बांधलेले घरांचे फोटो आणि चित्रीकरण करून ती गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयशी थेट शेअर करू शकतात. नुकतेच राजस्थान मंत्रालयाने नवीन ॲप उपलब्ध करून दिले असून ॲपच्या माध्यमातून पुर्ण केले घरांचे चांगल्या रिझेल्यूशन किंवा हाय पिक्सलमध्ये फोटो किंवा व्हिडीओ ॲपवर अपलोड करण्याची परवानगी मिळाली आहे. ॲपवर अपलोड केलेल्या फोटो किंवा व्हिडीओ यांची छाननी करण्यात येणार असून पंतप्रधान आवास योजनेच्या वर्धापनदिनी निवड केलेल्या लाभार्थीला आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे.

राजस्थानमध्ये शहरी विकास आणि गृहनिर्माण विभागाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरी भागात अंदाजे 26 हजार हून अधिक लाभार्थी आहेत. लाभार्थीने सेल्फी फोटोसह 30 ते 60 सेकंदाचा व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा प्रदान केली आहे. या ॲपच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेचे कामात अधिक पारदर्शकता निर्माण होणार आहे. काही अडचण निर्माण झाल्यास ॲपच्या माध्यमातून अडचणी समजावून थेट संपर्क साधता येणार आहे.
इंदीरा आवास योजना बदलवून पंतप्रधान आवास योजना असे नाव देण्यात आले. राजस्थान सरकारने पंतप्रधान आवास योजनेची एप्रिल 2016 मध्ये अंमलबजावणी केली होती. शहरी भागाव्यतीरिक्त ग्रामीण भागात जवळपास 4 लाख 35 हजार घरे पुर्ण केले आहे. तर मंजूर केलेली घरे 2022 पर्यंत पुर्ण करण्याचे उदिष्ट्ये ठेवण्यात आली आहे.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा