घडामोडी, शासकीय

निर्माणाधीन घरांच्या जीएसटीमध्ये कपात

Share

नवी दिल्ली वृत्तसंस्था । निर्माणाधीन तसेच सवलतीच्या दरातील घरांच्या जीएसटीमध्ये कपात करण्याची घोषणा आज वित्तमंत्री अरूण जेटली यांनी केली.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी काऊन्सीलची बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषदेत जेटली यांनी यात झालेल्या निर्णयांची माहिती दिली. बांधण्यात येत असलेल्या घरांच्या जीएसटीमध्ये कपात करण्याची मागणी कधीपासूनच करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमिवर, आता या प्रकारातील घरांना १२ ऐवजी ५ टक्के जीएसटी लागणार आहे. यामुळे अर्थातच घरे स्वस्त होणार आहे. तर विविध शासकीय घरांसाठी फक्त १ टक्का जीएसटी लागणार असल्याची माहितीसुध्दा जेटली यांनी दिली.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा