तंत्रज्ञान, निवासी डिझाईन, रेसिडेन्शीयल इंटेरीयर डिझायनर्स

नवीन इमारतींमधील घरे झाले कमी आकाराचे

मुंबई । परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या काही वर्षापासून इमारत किंवा घरांचा आकार कमी करून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यास विकसक अधिक प्राधान्य देत आहे. याचे कारण आहे की, शहरात मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची किंमत वाढल्या असून घर घेणे तर दुरच जागा देखील घेणे कठीण झाले आहे.
नाईट फ्रँकच्या सल्लागार यांच्या अहवालाच्या माहितीनुसार बेंगलुरू, कोलकत्ता, मुंबई आणि पुणे या शहरातील अपार्टमेंटचे सरासरी आकार 2014 आणि 2017 च्या दरम्यान अनुक्रमे 7टक्के, 13 टक्के, 25 टक्के आणि 26 टक्के पर्यंत कमी करण्यात आली असल्याचे दिसून आले आहे.
ब्रिगेड इंटरप्राईजेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विश्वप्रसाद विशू यांनी सांगितले की, 2011 मध्ये 2 बीएचके घरास 1200 स्क्वेअर फुट जागा लागत होती. नंतर लोकांच्या मागणीनुसार कमी बजेटमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता 1000 स्क्वेअर फुट जागा पुरेशी आहे. खरेदीदारांना 12 ते 15 लाखांपर्यंत घर आणि घरांत सर्व मुलभूत सुविधाही उपलब्ध असणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.