गृहनिर्माण, घडामोडी, नगरविकास

दिल्लीत डीडीएचे चार ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पाचे प्रस्ताव

नवी दिल्ली । दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी (डीडीए)च्या गृहनिर्माण योजनांनी नेहमीच घर खरेदीदारांना आकर्षित करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. डीडीएने दिल्लीत अशा चार ठिकाण कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती डीडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ही गृहनिर्माण योजना पंतप्रधान आवास योजनांतर्गत राबविण्यात येणार असून घर घेणाऱ्यास सबसिडीही दिली जाणार आहे.

या योजनेंतर्गत देण्यात येणारे प्लॅट्स हे ३०-35 चौरस मीटर असून यात वन बेड, हॉल आणि किचन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी डीडीएने ऑनलाईन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून घर खरेदी करणाऱ्या इच्छुकांनी हवे असल्यास प्लॅट्स कसे असतील याबाबतद लेआऊट, इमारतीचा फोटो आणि आजूबाजूचा परीसर कसा राहणार आहे याची माहिती देखील पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एखादा प्लॅट्स आवडल्यानंतर अधिकृतरित्या नोंदणी करून घर बुक करू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published.