केंद्र शासन, घडामोडी, निर्णय, रिअल इस्टेट

तामिळनाडू सरकारची बांधकामसंबंधित नियमास मान्यता

Share

चेन्नई । तामिलनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलनीस्वामी यांच्या उपस्थितीत 4 फेब्रुवारी रोजी तामिळनाडू संयुक्त विकास नियमन आणि बिल्डींग नियमन अंतर्गत शहरी विकासासाठी नियम लागू करण्यात आले आहे. या निमायाची अंमलबजावणीला सुरूवात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या नियमासाठीचा प्रस्ताव व आराखडा तयार करण्यात आला होता. तर तामिळनाडू मंत्रिमंडळाने 15 दिवसांपुर्वीची या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली होती.

रहिवाशीकडे तीन घरे किंवा 750 स्क्वेअरफूट असलेल्यांना या नियमानुसार प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तर चार घरे किंवा 750 स्क्वेअरफूट पेक्षा जास्त जागा असलेल्या इमारतींसाठी पालिकेची परवानगी लागणार आहे. गृहनिर्माण करणार्‍यांना याबाबतच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. संबंधित प्रकल्प उभारणीसाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरची परवानगी शिवाय करता येणार नाही. अशी माहिती सुत्रांकडून कळाली आहे.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा