featured, केंद्र शासन, घडामोडी, शासकीय

….तर घर खरेदीवर जीएसटी आकारणी नाही !

Share

नवी दिल्ली वृत्तसंस्था । बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर संबंधीत घराच्या खरेदीसाठी जीएसटी कराची आकारणी करण्यात येणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय वित्त मंत्रालयाने जाहीर केला आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाने एका प्रेस नोटच्या माध्यमातून देशातील रिअल इस्टेटला दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. याच्या अंतर्गत कोणत्याही वास्तूचे कंप्लीशन सर्टीफिकेट म्हणजेच पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर खरेदी केल्यास यावर वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी आकारणी करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र बांधकाम अर्धवट असणारे/सुरू असणार्‍या घरांना जीएसटी लागणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे कंप्लीशन सर्टफिकेट न मिळालेल्या मात्र रहिवासासाठी योग्य असणार्‍या घरांच्या विक्री प्रक्रियेतही जीएसटी लागणार असल्याची बाब यात नमूद करण्यात आलेली आहे.

यात पुढे नमूद करण्यात आलेले आहे की, प्रधानमंत्री आवास योजना, राजीव गांधी आवास योजना आदींसारख्या शासकीय गृहनिर्माण योजनांसाठी ८ टक्के जीएसटी लागणार आहे. ही रक्कम विकसकाच्या इनपुट टॅक्स क्रेडीट (आयटीसी) मधून अ‍ॅडजस्ट करण्यात येणार आहे. यामुळे बिल्डरलाही रोखीत जीएसटी जमा करण्याची आवश्यकता नाही. दरम्यान, या निर्णयाचा विकसक आणि खरेदीदार या दोन्ही वर्गांना लाभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

RelatedPost


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा