featured, घडामोडी, प्रॉपर्टीज, रेरा/महारेरा

खरेदीदाराने ठरविल्यास विकसकास दुसरी संधी मिळेल: महारेरा

Share

मुंबई । महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (महारेरा)ने असा निर्णय घेतला आहे की, एखाद्या विकसकाने वेळेत घर किंवा प्रकल्प पुर्ण करून शकला नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्यापुर्वी घर खरेदीदार किंवा ग्राहकांपैकी 50 टक्के ग्राहकांची सहमतीने ते प्रकल्प पुर्ण करण्यास दुसरी संधी दिली जाणार आहे.

महारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी सांगितले की, ग्राहकांना वाटल्यास बांधकाम व्यवसायिकाने वेळे घर पुर्ण न करू शकल्यास दुसरी संधी देवू शकतात. हे बांधकाम व्यवसायिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. याबाबचे आदेश एका आठवड्यात निघणार आहे. मात्र दुसरी संधी देण्यापुर्वी 50 टक्के ग्राहकांची परवानगी असणे आवश्यक आहे. तसेच नियमानुसार दुसर्‍यावेळी दिलेली कालावधीच्या आत ग्राहकांना घर बांधून देण्याचे विकसन बांधिल राहणार आहे.
आत्तापर्यंत महारेराकडे आलेल्या तक्रारींमध्ये 90 टक्के तक्रार ही घरे वेळेत न बांधल्याची आहे. आता या निर्णयामुळे खरेदीदारच नाही तर विकसकांना देखील दिलासा मिळाला असल्याची माहिती क्रेडाई राज्यमंत्री शांतीलाल कटारिया यांनी सांगितले. विकसकांवर कारवाई करावी हा पर्याय शेवटचा नसल्याने दोन्ही पक्षांनी निश्चित केलेल्या कालावधीत प्रकल्प पुर्ण झाल्यास दोघांकरीत ही भूमीका महत्वाची असल्याचे कटारिया यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून रिअल इस्टेटच्या क्षेत्रात बरीच घडामोडी व अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आता कुठे हे क्षेत्र पुर्वपदावर आले आहे. तसेच बाजारपेठेत रिअल इस्टेटच्या कामांना आता गती वाढली आहे.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा