गृहनिर्माण, घडामोडी, प्रधानमंत्री आवास योजना

इंदौरला परवडणारी 1000 घरे एप्रिलपर्यंत पुर्ण होणार

Share

इंदौर – इंदौर महानगरपालिका (आयएमसी) ने परवडणारी एक हजार घरे येत्या एप्रिलपर्यंत पुर्ण करण्याच्या मार्गावर आहे. ज्यातील आत्तापर्यंत 130 घरांसाठी नोंदणी करण्यात आली आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून स्वस्तात घर आणि 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार इंदौर महानगरपालिकेने सुरु केलेल्या या योजनेंतर्गंत खासगी बांधकाम व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. खासगी व्यवसायिकांना आपल्या घरांचा प्रकल्प किंवा गृहनिर्माण प्रकल्प पालिकेच्या हद्दीबाहेर उभारता येणार आहे.
पंतप्रधाना आवास योजनेंचे जिल्हा अधिक्षक डी.आर. लोधी यांनी सांगितले की, एप्रिल 2019 मध्ये साधारणपणे 1000 घरे सर्व सुविधांयुक्त पुर्ण करण्यात येणार आहे. त्यातील 130 घरे बुंकिंग केलील असून बायना रक्कम सुमारे दोड कोटी रुपये इंदौर मनपा प्रशासनाकडे जमा केले आहे.
उभारणी केलेल्या घरे साधारणपणे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना प्रधान्य देण्यात येणार आहे. तर शहरातील याप्रकारे इतर ठिकाणी या योजनेंतर्गत 13 हजार 288 घरांचे कामांना मंजूरी मिळाली असून ते लवकरच पुण करण्याचा मानस असल्याचे इंदौर महानगरपालिकेने सांगितले आहे.
क्रडाईच्या म्हणण्यानुसार, परवडणारी घरे ही जरी संकल्पना केंद्र सरकारची असली तरी या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा