घडामोडी, रेरा/महारेरा

अखेर तामिळनाडू रेरा चेअरमनपदाची नियुक्ती

Share

चेन्नई – तामिळनाडू रेराचे अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे अनेक वेळा बांधकाम क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला होता. तामिळनाडू रेराच्या अध्यक्षपदी ज्ञानेशिकेक यांची नियुक्ती करण्यात आल्याने चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे. गेल्या वर्षभरापासून चेअरमनपद रिक्त होते.

गृहनिर्माण आणि शहरी विकास विभागाचे सचिव एस कृष्णन यांच्याकडून आपल्या कामाची सुत्रे नवनियुक्त चेअरमन ज्ञानेशिकेक घेणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंतापदी एस. मनोहर तर कायदे सल्लागारपदी व्ही. जयाकुमार यांचीदेखील नियुक्ती केली आहे.
रेरा कायदा लागू करण्यात आला तेव्हापासून ते एक वर्षाच्या आत राज्य सरकाने आपल्या राज्याच्या रेरा अध्यक्षपदाची नियुक्ती करणे अनिर्वाय असते. मात्र तामिळनाडू राज्यात रेरा अध्यक्षपदाची नियुक्ती अद्याप झालेली नव्हती.
घर खरेदीदार आणि बांधकाम व्यवसायिक यांच्या व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी रेरा कायद्याची अंमलबजावणी देशात करण्यात आली. या कायद्यांतर्गत राज्य आपापल्या राज्यातील बांधकाम विकसकांकडे करडी नजर ठेवून आहे. वेळेत काम आणि चांगल्या दर्जाचे कामासह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यास बांधकाम व्यवसायिक कटिबंध्द राहतात. हा कायदा देशात 22 जून 2017 रोजी अंमलबजावणी करण्यात आली.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा